एकूण पृष्ठदृश्ये

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

संधी


एका आटपाट नगरीच्या राजाने आपल्या एकुलत्या एक लावण्यवती मुलीच्या लग्नाचे स्वयंवर ठेवले, राज्यात तशी दवंडी पिटवली....
स्वयंवरासाठी एक जाचक अट ठेवली... *एका दरवाज्यातून पिसाळलेला बैल सोडण्यात येईल अन २० फुटावर असलेल्या दरवाजातून तो बाहेर पळत जाईल.. या बैलाच्या शेपटीला धरून जो तो दरवाजा पार करेल त्याच्याशी राजकन्येचे लग्न लावून त्याला बक्षीस म्हणून अर्धे राज्य दिले जाईल ! प्रत्येकाला ३ वेळा संधी देण्यात येईल !*
मग काय ! अनेक तरुण इच्छुक झाले...! सराव सुरू झाले.. राज्यभरातील तरुण कामाला लागले.. मेहनत घेऊ लागले... रात्री स्वप्न रंगवू लागले....
साहजिकच होते ना त्यांचे.. फक्त २० फुटाचे अंतर निर्भयपणे, हिमतीने पार केले की सुंदर राजकन्या अन अर्धे राज्य मिळणार होते !
स्वयंवराचा दिवस उगवला .....
सर्व जनता जमा झाली... पहिल्या दरवाजातून बैल डोकावला...! त्याला पाहताक्षणीच तरुणांचा थरकाप उडाला .. साधासुधा बैल नव्हता तो .. अगदी जंगली सांड होता अन त्यात पिसाळलेला...! सर्व तरुण दोन पाऊल मागे सरकले !
पण एक तरुण जिद्दीला पेटला... पुढे होऊन मैदानात उतरला.... पहिला बैल सोडण्याची घोषणा झाली......
त्याच्याकडे पाहून त्याने मनात विचार केला की तीन संधी आहेतच याला जाऊ द्या ! याचे फक्त अवलोकन करू.... बैल उधळला अन तसाच पुढे निघून गेला..!
दुसरा बैल सोडण्याची घोषणा झाली.... पहिल्या बैलापेक्षा हा बलदंड होता... त्याला पाहून याचे अवसान गळायला लागले... बैल उधळला पण आणखी एक संधी आहे म्हणून हा जाग्यावरच स्थिर राहिला ...!
आता मात्र शेवटची संधी होती... *मेलो तरी बेहत्तर पण मी ही संधी सोडणार नाही !* याची त्याने मनोमन गाठ मारली...!
तिसरा बैल घोषणा होताच उधळला, तरुणाने जीवाचा आकांत करून आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावला...…... पण याचे नशीब करंटे .....
'तिसऱ्या बैलाला शेपुटच नव्हते !'
राजाने स्पष्टीकरण देत सांगितले, *संधी दोन वेळ तुझ्याकडे चालून आली अन तू तिचे सोने न करता तिसऱ्या संधीची वाट पहात होतास पण तिसऱ्या वेळेस संधीने तुला हुलकावणी दिली.....
*संधीचे सोने करणाराच या जगात यशस्वी होतो !*

सोमवार, ११ डिसेंबर, २०१७

सत्यकथा ‘डनहिल’ (Dunhill)ची

लंडनच्या एका चर्चमधे ‘अल्फ्रेड डनहिल’ (Alfred Dunhill) नांवाचा एक माणूस ‘सफाई कामगार’ म्हणून काम करता होता. चर्चची जमीन रोज झाडुन काढणे, टेबल्स व बेंचेस पुसणे, तसेच चर्चमधले छोटेसे स्टेज व बोलण्याचा स्टँड चकाचक साफ ठेवणे हे त्याचे मुख्य काम होते. तसेच तो चर्चचा केअरटेकर पण होता.
चर्चमधे काम करणार्या. माणसाचे कमीत कमी शालेय शिक्षण तरी पूर्ण असावे असा या चर्चचा नियम होता. डनहिल तर अशिक्षीत होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नव्हते त्यामूळे त्याला लिहीता वाचता पण येत नव्हते. त्या चर्चचा जो मुख्य पाद्री म्हणजेच फादर होता त्याला चर्चचे काही नियम धाब्यावर बसवण्याची सवय होती. म्हणुनच डनहिल सारखा एक अशिक्षीत माणूस त्या चर्चमधे काम करू शकत होता. डनहिलने पण बरीच वर्षे, म्हणजे उतारवय होईपर्यंत  तेथे काम केले.
वृद्धत्वामूळे चर्चचा जुना प्रमुख निवृत्त झाला व त्याजागी एक तरूण माणूस चर्चचा प्रमूख म्हणून आला. तो चर्चच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणारा होता. जेव्हा त्याला कळले कि डनहिलचे शालेय शिक्षण पूर्ण झालेले नाही तेव्हा त्याने डनहिलला नोटीस पाठवली व सहा महिन्यांच्या आत शालेय शिक्षण पूर्ण करून तसा दाखला आणण्यास सांगीतले.
डनहिलला जाणवले की त्याच्या या उतार वयात सहा महिन्यात शालेय शिक्षण पूर्ण करणे शक्य नाही. तुम्ही उतार वयातील कुत्र्याला नवीन ट्रिक्स शिकवू शकत नाही. त्यामूळे राजीनामा देण्याशीवाय गत्यंतर नाही हे त्याच्या लक्षात आले. पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न होताच.
एके दिवशी दुपारी डनहिल विचार करत पायी फिरायला बाहेर पडला व चालत लंडनच्या प्रसिद्ध बॉन्डस्ट्रिटवर आला. त्याला सिगारेट ओढायची तल्लफ आली म्हणून त्याने सिगारेटचे दुकान शोधायला सुरवात केली. त्याला आख्या बॉन्डस्ट्रीटवर कोठेही सिगारेटचे एकही दुकान आढळले नाही. शेवटी बाजुच्या एका छोट्या गल्लीत सिगारेटचे एक छोटेसे दुकान आढळले. आपण बॉन्ड स्ट्रीटवर जर सिगारेटचे दुकान टाकले तर? डनहिलच्या मनात आले. लगेच त्याच्या मनात बिझनेसचा प्लॅन पक्का झाला.
त्याने चर्चच्या नोकरीचा राजीनामा दिला व बॉन्ड स्ट्रीटवर स्वतःचे एक छोटेसे सिगारेटचे दुकान चालू केले. बघता बघता त्याचे दुकान लोकप्रिय झाले व धंदा तुफान चालू लागला. त्याने बघीतले की त्याच्या दुकानात येणार्या ग्राहकांपैकी बरेच ग्राहक हे बॉन्ड स्ट्रीटच्या पलिकडच्या बाजूने येतात. लगेच त्याने पलीकडच्या बाजूला दुकान टाकले. बघता बघता त्याच्या दुकानांची संख्या दोनाची चार करत तीन वर्षात सोळा झाली.
अल्फ्रेड डनहिल कंपनी इंग्लंडमधला आघाडीचा टोबॅको ब्रॅन्ड झाला.
पुढे त्याने स्वतः मशीनवर सिगारेट्स बनवायला सुरवात केली व ‘डनहिल’ या ब्रॅन्डखाली सिगारेट्स विकायला सुरवात केली व तो पाच वर्षात लक्षाधीश झाला.
त्याच्या सिगारेटससाठी सतत तंबाखुचा पुरवठा व्हावा त्यासाठी अमेरिकेतील दोन तंबाखू उत्पादन करणार्याब शेतकर्यां बरोबर ऍग्रीमेन्ट करायला तो स्वतः अमेरिकेला गेला. या करारामुळे त्या दोन अमेरिकन शेतकर्यां चे नशीब तर फळफळलेच पण तो करार हा एक महत्वाचा सार्वजनिक समारंभच ठरला. कारण या समारंभासाठी गव्हर्नर व सिनेटर जातीने उपस्धीत होते. या करारावर इतरांनी सह्या ठोकल्या पण डनहिलने मात्र आपला अंगठा उमटवला कारण त्याला सही करायला येत नव्हती.
हे पाहून गव्हर्नर चांगलेच प्रभावीत झाले व डनहिलला म्हणाले, ‘ सर! हे खरोखरच अप्रतीम आहे. तुमचे काहीही शिक्षण झालेले नसताना देखील तुम्ही एवढे प्रचंड यश मिळवलेत. जर तुमचे शिक्षण झाले असते तर काय झाले असते?’
डनहिलने त्यांना मिस्किलपणे उत्तर दिले, ‘मला जर लिहीता वाचता आले असते तर अजुनही मी चर्चमधे झाडू मारण्याचे व फरशा पुसण्याचे काम करत राहीलो असतो!’

आज सुद्धा ‘डनहिल’ हा जगप्रसिद्ध सिगारेट ब्रॅन्ड आहे.

शनिवार, ९ सप्टेंबर, २०१७

डॉ बाबासाहेब आंबेडकर

(----: वाचनात आलेला  लेख :----)
.
२००८ च्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट! मला भेटायला एक अमेरिकन मुलगी आली होती. तिचं नाव क्लारी ड्रोस्ते. ती अमेरिकेवरून भारतात अभ्यास करायला आली होती. तिचं वय साधारणत: २१-२२ असावं! तिच्याशी चर्चा केल्यानंतर कळले की, ती बी.ए. करीत असून ‘बुद्धिझम ऍण्ड आंबेडकर’ हा तिच्या लघुशोधप्रबंधाचा विषय आहे.
मला क्लारीचं कौतुक वाटलं! डॉ. आंबेडकरांविषयी तुला माहिती कशी मिळाली आणि तू हाच विषय का निवडला? असे दोन्ही प्रश्‍न एकदमच तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘डॉ. आंबेडकरांविषयी अमेरिकेत सर्वांना माहिती आहे. डॉ. आंबेडकरांविषयी ऑक्सफर्ड प्रकाशनाची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अमेरिकेतील नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे विशेष आकर्षण वाटते.’’
‘‘नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे का आकर्षण वाटते?’’ – माझा प्रश्‍न.
‘‘का म्हणजे? डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्य सर्वच देशातील लोकांसाठी भूषणास्पद आणि आदर्श आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात एक अमेरिकन तरुणी भरभरून बोेलत होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्‍वास आणि स्पष्टता होती. तिच्या डोळयात दुर्दम्य इच्छाशक्ती दिसत होती. ती पुढे म्हणाली, ‘‘डॉ. आंबेडकर महान तर आहेतच, पण आणखी महत्वाची बाब म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आधुनिक काळात अमेरिकन लोकांंना बुद्ध धम्माविषयी विशेष रूची आहे. ते बुद्ध धम्माचा अभ्यास करू लागलेत.’ आज भारतातील नवीन पिढीला अमेरिकेचे आकर्षण आहे. तर अमेरिकेतील नव्या पिढीला बुद्ध अणि डॉ. आंबेडकरांमुळे भारताचे आकर्षण आहे.
फ्लोरेन्सिआ कोस्टा ही ब्राझीलची पत्रकार २००७ मध्ये भारतात गांधींना भेटायला आली होती. महात्मा गांधींचे निधन १९४८ मध्ये झाले. मग कोस्टा कशी काय गांधींना भेटायला आली?
फ्लोरेन्सिआने एक लेख टाईम्स ऑफ इंडियाच्या १२ ऑगस्ट २००७ या अंकात लिहिला होता. त्या लेखात ती लिहिते की, ‘‘आमच्या ब्राझील देशात गांधींचे खूप नाव आहे. भारतातील लोक गांधीच्या आदर्शानुसार कसे जगतात हे बघायचे होते, म्हणून मी भारतात आली. भारतात मद्रास पासून दिल्लीपर्यंत सर्वत्र फिरली. परंतु मला कुठेच गांधी दिसले नाही. गांधी लोकांमध्ये, लोकांच्या मनात दिसले नाही. फ्लोरेन्सिआ लेखाच्या शेवटी नमूद करते की, ‘‘आजच्या भारतात गांधी आणि त्यांच्या विचारांना कुठेही जागा नाही.’’ परंतु तिने एक गोष्ट नम्रपणे कबूल केली. ती म्हणजे, पण मला सर्वत्र डॉ. आंबेडकर दिसले. लोकांमध्ये गांधी दिसले नाही पण मला डॉ. आंबेडकर लोकांमध्ये दिसले’.
निग्रो अमेरिकन लेखिका आणि पत्रकार वॅलेरी मॅसोन जॉन मार्च, २००८ मध्ये नागपूरमध्ये एका कार्यक्रमात आली होती. तिची एक मुलाखत ४ मार्च २००८ च्या ‘हितवाद’ मध्ये प्रकाशित झाली होती. ती म्हणाली की, मी डॉ. आंबेडकरांच्या कार्याने प्रेरीत झाली आहे. ती पुढे म्हणाली की, ‘‘मी बुद्ध धम्माकडे आकर्षित झाली. म्हणून अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मला सम्राट अशोकाविषयी माहिती मिळाली. बुद्ध धम्माचा अभ्यास करताना मी डॉ. आंबेडकरांबद्दल वाचले.’’ वॅलेरी मॅसोन जॉनच्या मते, ‘‘डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील सम्राट अशोक आहेत.’’ इग्लंडमधील मजूर पक्षाचे माजी नेते मायकेल फुट यांनी डॉ. आंबेडकराबद्दल एक अतिशय महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘‘गांधी, नेहरू सारखे भारतीय नेते फारच महान होते. परंतु डॉ. आंबेडकर हे त्या महान नेत्यांमध्ये महानतम होते.’’ त्यांचे हे विधान आज सत्य ठरले आहे.
९ डिसेंबर १९५६ च्या ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ ने डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतांना लिहिले होते की, ‘‘जेव्हा लोक आपल्या देशातील आमच्या समकालीन तथाकथित महान नेत्यांना विसरतील, तेव्हा डॉ. आंबेडकरांचीच आठवण केली जाईल’.
पाकिस्तानमधील कराची येथे १४ एप्रिल २००७ ला डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत मला अतिथी आणि वक्ता म्हणून निमंत्रित केले होते. तेथील मुस्लिम लोकांना, डॉ. आंबेडकरांविषयी आपणास विशेष आस्था का वाटते? असा प्रश्‍न मी विचारला होता. तेव्हा डॉ. इब्राहिम खान म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर हे आशिया खंडातील एक महान मानवतावादी होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची अद्वितीय अशी राज्यघटना लिहिली म्हणून देशातील कोणत्या मोठ्या विद्यापीठाने त्यांना एलएल.डी पदवी दिली नाही. परंतु १९५२ मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने मात्र त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या संविधान तयार करण्याच्या महान कार्याचा सन्मान केला.
भदंत सुरेई ससाई हे जेव्हा सुरूवातीला भारतात आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत गांधीजींचा फोटो होता. येथील बौद्धांना सुरेई ससाई यांचे आश्‍चर्य वाटत होते. नंतर सुरेई ससाई यांना वास्तविकता कळली. त्यानंतर ससाई यांच्या माध्यमातून जपानला डॉ. आंबेडकर कळले आणि त्यांचा गांधीबद्दचा भ्रम दूर झाला. आता तर सर्वच बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांना अतिशय सन्मानाचे स्थान आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित शोषित, पिडीत समाजाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा विविध देशातील शोषित पिडीत जनतेच्या उत्थानाच्या दृष्टीने जगाला प्रेरक ठरला आहे. यासंबंधीचे एक अत्यंत महत्वाचे उदाहरण हंगेरियन लोकांचे आहे.
हंगेरियन लोकांवर डॉ. आंबेडकरांचा प्रचंड प्रभाव
आहे. श्‍वेत हंगेरियन डेरडाक टिबोर हे हंगेरी देशातील एक समाजसुधारक आहेत. टिबोर हे २००४ मध्ये फ्रान्समध्ये गेले होते. फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील एका बुक स्टॉलवर फ्रेंच लेखक ख्र्रिस्तोफरजेफरलॉट यांनी लिहिलेले एक पुस्तक टिबोरने बघितले. ते त्यांनी विकत घेतले. ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांनी आपला मित्र आणि जिप्सी नेता जानोस ओरसोस यांना त्या पुस्तकाबद्दल सांगितले. जानोस देखील खूप प्रभावित झाला. फ्रेंच भाषेतील ज्या पुस्तकाचा टिबोर आणि जानोस यांच्यावर प्रभाव पडला ते पुस्तक म्हणजे ‘डॉ. आंबेडकर ऍण्ड अनटचेबिलीटी’ हे होय. डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्याचा आणि विचारांचा टिबोर आणि जानोस यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी डॉ. आंबेडकरांना आपला आदर्श मानले. त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनुसार जिप्सी लोकांच्या उद्धाराची चळवळ सुरू केली. जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे श्‍वेत हंगेरियन लोकांवर देखील फार मोठा प्रभाव आहे. श्‍वेत हंगेरियन लोक देखील डॉ. आंबेडकरांना मानतात. बर्‍याच श्‍वेत लोकांनी बुद्ध धम्म स्विकारला. जिप्सी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी, म्हणून श्‍वेत हंगेरियन लोकांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. यांच्या प्रयत्नातूनच ‘लिटल टायगर स्कूल’ २००५ मध्ये स्थापन केले आणि इतर अनेक प्रकल्प राबविलेत. जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माचा प्रचंंड प्रभाव पडल्यामुळे जिप्सी नेता जानोस यांनी जिप्सी लोकांच्या उद्धारासाठी ‘जयभीम नेटवर्क’ किंवा ‘जयभीम संघ’ची स्थापना केली.
हंगेरियन लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माच्या पडत असलेल्या प्रभावाची हंगेरियन सरकारला देखील दखल घ्यावी लागली, हे येथे उल्लेखनीय.
आजपर्यंत भारतीय नेत्यांनी डॉ. आंबेडकरांची ओळख जगाला होऊ दिली नाही. परंतु त्यांच्या विचार आणि कर्तृत्वामुळे त्यांची जगाला ओळख झाली. इतकेच नव्हे तर पुढील काही वर्षात जगातील तरूणांचे आदर्श हे केवळ डॉ. आंबेडकर राहतील! ही केवळ कल्पना नाही, तर ती वास्तविकता असेल...
जय✺भीम_/!\_नमो✺बुद्धाय बंधूनो

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

प्रयत्नांती यश प्राप्ती

*नक्की वाचा*
"धीरूबाई अम्बानी" Great think...
एकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते.
वाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, 'आता काय करू?'
त्याला अम्बानींनी उत्तर दिले -- तू गाडी चालवत रहा.
पावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते. परत ड्राइवरने विचारले, 'आता काय करू?' त्याला अम्बानी म्हणाले 'तू गाडी चालवत रहा'.
थोडे पुढे गेल्यानंतर ड्राइवरने पाहिले की वाटेत पावसा मुळे अनेक वाहने थांबली होती. ड्राइवरने अम्बानींना सांगितले, 'मला आता गाडी थांबवायला हवी' पुढचे दिसतांना खूप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेऊन थांबलेत.
आता काय करू?
त्याला अम्बानींनी पुन्हा सांगितले 'तू थांबू नको हळू हळू तुला जमेल तशी गाडी चालवत रहा'.
पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्राइवरने गाडी चालूच ठेवली होती.
आणि थोडे पुढे गेल्यावर ड्राइवरला समोरचे साफ दिसायला लागले. पुढे काही अंतर गेल्यावर पाऊस पूर्ण पणे गेला होता. पुढे तर ऊन पडले होते.
धीरूभाई अम्बानी ड्राइवरला म्हणाले 'आता तू गाडी थांबवू शकतोस'.
ड्राइवर म्हणाला आता कशाला?
धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे. त्याने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतून उतरले आणि म्हणाले, तू बाहेर ये आणि मागे वळून बघ. आपण जिथे आहोत तिथे पाऊस अजिबात नाही आहे. इथे तर चक्क ऊन पडले आहे. वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि आता त्या धोक्यातून आपण पूर्ण पणे बाहेर पडलो. तू धीर खचून तिथेच थांबला असतास तर अजून खूप वेळ तिथेच थांबावे लागले असते.
हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परिस्थितून जात आहेत.
कठीण काळी खूप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही. प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.

गुरुवार, १३ जुलै, २०१७

जीवन गाणे गातच राहावे

गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो आणि खालच्या टरफलांमध्ये गायब होतो......आपण मग तो बोटाने शोधायला सुरूवात करतो......अगदी अर्धा ते एक मिनिटाची ही क्रिया, पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....थोडेसे तरी वैतागतो.....या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....आयुष्याचे देखील असेच आहे का ?? ? पाटीभर आनंद शेजारी असूनही, आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते..... ​आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अनुभवा.... गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा.... नेहमी आनंदी राहा..

शनिवार, २७ मे, २०१७

प्लॉट खरेदी करताना घ्यावयाची काळजी

१. ज्या व्यक्तीचा प्लॉट विकावयाचा आहे तो विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा नाही याची खात्री ७/१२ उतारा पाडून करणे. २. विकणाऱ्या व्यक्तीकडून चालू तारखेचा ७/१२ उताऱ्याचे फेरफाराची व जागेचा झोन दाखला इ. मागणी करावी. ३. जमीन/प्लॉट स्वतः पाहून त्यास जाण्या येण्यासाठी पोहोच मार्ग आहे किंवा नाही हे पहावे. ४. विकणाऱ्या प्लॉटच्या शेतसारा भरलेला आहे किंवा नाही ते पहावे तसेच ३० वर्षापूर्वीचे ७/१२ उतारे पाहावेत. ५. ७/१२ उतारा पाहतेवेळी ७/१२ उताऱ्यावरील सर्व बाबींचा विचार करावा. ६. प्लॉटचा व्यवहार ठरल्यानंतर विकणाऱ्या मालकाकडून १५ दिवसांची जाहीर नोटीस वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी लेखी संमती घ्यावी संमती घेतेवेळी स.नं. प्लॉट.नं. क्षेत्र आकार व चतुर्सिमा इ. उल्लेख असावा. ७. वर्तमानपत्रामध्ये वकिलांमार्फत जाहीर नोटीस देण्यात यावी वर्तमान पत्रामध्ये नोटीस दिल्यानंतर वर्तमानपत्र जपू ठेवावे. ८. नोटीस दिल्यानंतर मुदतीपर्यंत कोणाचीही तोंडी अथवा लेखी तक्रार आल्यास त्याचे पूर्ण शंका समाधान विकणाऱ्या जमीन मालकाकडून करून घेणे गरजेचे आहे. ९. जागेच्या नकाशालगतच्या चतुर्सिमा धारकांची नावे ७/१२ उतारे काढून घ्यावेत व त्यांचे स.न.प्लॉट.न. इ. खात्री करावी. १०. शासकीय होणारी स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी, वकील फी, लिखाणावळ फी देऊन खरेदीखत करून घ्यावे. ११. खरेदीखतामध्ये चतुर्सिमा चा उल्लेख करताना खालील गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे १२. खरेदीखत झाल्यानंतर इंडेक्स दोन मिळाल्या नंतर मा. गावकामगार तलाठी यांच्या कार्यलयामध्ये त्याची दप्तरी ७/१२ उताऱ्यासाठी नोंद करून घ्यावी. १३. आपण आपल्या जागेचा ७/१२ चा उतारा नोंद झाल्यानंतर प्रत्येक ६ महिन्यानंतर मा. तलाठी यांचेकडून काढावा व तो जपून ठेवावा. जागा खरेदी झाल्यानंतर ७/१२ उतारा नोंद झाल्यानंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे ताबा घेणे म्हणजे प्लॉटला चारही बाजूने कुंपण करणे.

शुक्रवार, १९ मे, २०१७

आधार बिल

*_आधार बिल बद्दल माहिती_* ♻संसदेत 16 मार्च 2016 रोजी आधार (वित्तीय व इतर अनुदान, लाभ व सेवा लक्षित पुरवठा) विधेयक, 2016मुळ स्वरुपात संमत करण्यात आले.  ♻केंद्र सरकारने आधार विधेयकास धन विधेयक स्वरुपात लोकसभेमध्ये सादर केले. 💠आधार बिल विधेयकाचा उद्देश - ♻सामान्य जनता, गरिबांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविणे. 💠आधार बिल - भारताच्या प्रत्येक नागरिकास एक बहूउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र उपलब्ध करण्याच्या उद्देशाने "आधार" ची संकल्पना मांडण्यात आली. बायोमेट्रिक माहिती जसे बोटांचे ठसे, डोळ्यांच्या बुबळांना ओळख स्वरुपात जोडण्यात आले आहे. 28 जानेवारी 2009 रोजी यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचा अध्यक्ष म्हणून माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांची निवड करण्यात आली. आधार 12 अंकांचा एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे, जो "भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण" सर्व भारतीयांसाठी उपलब्ध करतो. ♻ 12 अंकी आधार क्रमांक भारतामध्ये कोठेही व्यक्तीची ओळख व पत्त्याच्या स्वरुपात मान्य राहील.  भारतामध्ये 29 सप्टेंबर 2010 रोजी पहिली आधार संख्या सादर करण्यात आली.  वर्ष 2016-17 च्या साधारण अर्थसंकल्पामध्ये एक प्रस्ताव सादर करण्यात आला, ज्यामध्ये अनुदान आणि दुसरे सरकारी लाभासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. सध्या 98 कोटी लोकांना आधारकार्ड नंबर देण्यात आला आहे. ♻ सरासरी प्रति 26 लाख बायोमेट्रिक आणि 1.5 लाख e-kyc पेमेंट करण्यात येतात. आधार 11.19 कोटी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT) खात्याशी जोडण्यात आला आहे; परंतु देशामध्ये 16.5 कोटी LPG ग्राहक खात्यामध्ये अनुदानाचा लाभ घेत आहेत. 💠आधारचे लाभ/फायदे - ♻आधार संख्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनभराची ओळख आहे.  ♻सरकारी व खासगी माहिती आधारित नकली ओळखीस मोठया प्रमाणात समाप्त करण्यामध्ये आधारकार्ड महत्वपूर्ण मार्ग आहे. ♻ आधार संख्येपासून ग्राहकासबँकिंग, मोबाईल कनेक्शन आणि सरकारी व बिगर सरकारी सेवांची सुविधा मिळवण्यासाठी महत्वपूर्ण राहील.