एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

मनुस्मृती आणि कायदा

⛓ *मनुस्मृती 📕🔥, भारतीय संविधान 🇮🇳📓आणि स्ञी👸👮‍♀*

👉भारतामध्ये जेवढी स्त्रियांची अवनती झाली, तेवढी कोणत्याही देशात झाली नाही. स्त्रियांना या देशात अत्यंत हीन व पुरुषांपेक्षा दुय्यम स्थान देण्यात आले.
👉स्त्रियांच्या या अवनतीस *ब्राम्हणवादी व्यवस्था* कारणीभूत आहे.
👉स्त्रियांना परंपरागत गुलामगिरीतून काढून तिला स्वातंत्र्य देण्याचे व तिचे उध्दार करण्याचे कार्य *भगवान बुध्द, छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर* यांच्यासारख्या महामानवांनी केले आहे. त्यांनी जे स्त्री मुक्तीसाठी कार्य केले त्याला भारतीय इतिहासात तोड नाही.
👉काळ जसजसा पुढे सरकेल, येणारी पिढी *प्राचीन भारतातील गुलाम स्त्री व आधुनिक भारतातील स्वतंत्र स्त्री यांचा तुलनात्मक अभ्यास करेल, तेव्हा संपुर्ण देश फुले-आंबेडकरांच्या स्त्री मुक्तीच्या कार्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही.*
👉प्राचीन भारतातील मनुस्मृतीचे कायदे व प्रथा स्त्रियांसाठी कसे जाचक होते व हे अन्यायी कायदे फुले-आंबेडकरांनी कसे बदलविले ते पुढील आलेखावरुन दिसून येईल.

💥१.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-१८ व २-२६ नुसार स्त्रियांना वेदाभ्यास व विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला. एवढेच नव्हे तर आपस्तंभ धर्मसुत्र ६-११ नुसार एखादा विद्यार्थी वेद वाचत असतांना स्त्री समोर आली असेल तर त्याने वेद वाचणे थांबवावे असे लिहीले आहे.

👉महात्मा फुलेंनी *१ जानेवारी १८४८* रोजी *मुलींसाठी देशात पुण्यात पहिली शाळा* काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. *सावित्रीबाई फुले ह्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्यात.* डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या *कलम २९* नुसार *प्रत्येक स्त्रीस शिक्षणाचा मुलभूत अधिकार* बहाल केला.

💥२.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार  स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारुन ती स्वातंत्र्यास लायक नाही असे सांगितले.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम १४* नुसार  *देशातील सर्व स्त्री पुरुषास कायद्याने समान ठरविले व तिला स्वातंत्र्य उपभोगण्याचे समान हक्क दिले.* एवढेच नव्हे तर घटनेच्या *कलम ३१ (घ)* नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघानांही *समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार* दिला.

💥३.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-३ नुसार पतीला पत्नीची विक्री करण्याची मुभा देण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे महाभारतातील द्रोपदीला जुगारात हरण्याचे आहे.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम २३(१)* नुसार  *स्त्री-पुरुषांचा व्यापार व विक्री करण्यास मनाई* केली आहे.

💥४.मनुस्मृतील श्लोक क्रमांक २-६६ नुसार स्त्री ही अमंगल ठरविण्यात आले असून तिला धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणता येत नाही. मनुस्मृतील श्लोक क्रमांक १६-३६-३७ नुसार  ती जर मंत्र म्हणत असेल तर नरकात जाते.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम २५* नुसार *धर्म स्वातंत्र्याचा व धार्मिक विधीत सहभागी होण्याचा स्त्री-पुरुषांना समान अधिकार* आहे.

💥५.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४८ नुसार  स्त्रीला नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यास मनाई केली आहे. नवरा कसाही असला तरी तिने नवऱ्यासोबत राहावे असे तिच्यावर बंधन टाकले. पुरुषावर मात्र असे कोणतेही बंधन टाकले नाही.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ६ अनुसूची ३ (झ)* नुसार नवरा जर अन्यायी असेल तर त्याच्या जाचापासून मुक्त होण्यासाठी *घटस्फोट घेण्याचा अधिकार* दिला आहे.

💥६.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९-४१६ नुसार पत्नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नाही. तिने जरी स्वकष्टाने संपत्ती मिळवली असली तरीही त्यात तिचा हक्क नाही.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ३०० (क)* नुसार  *स्त्री किंवा पुरुषाला संपत्तीच्या हक्कापासून वंचित करता येत नाही.* तसेच बाबासाहेबांनी मांडलेल्या हिंदु कोड बिलाच्या आधारावर जो कायदा तयार करण्यात आला, त्यानूसार *स्त्रीला कुटुंबाच्या संपत्तीत समान हक्क* देण्यात आला आहे.

💥७.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ८-२९९ नुसार  स्त्रिला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला हक्क देण्यात आला. तसेच श्लोक क्रमांक ११-६७ नुसार  स्त्री हत्त्या झाली असेल तर मद्यपानाच्या अपराधाएवढा क्षुल्लक गुन्हा ठरविण्यात आला. एवढेच नव्हे तर, *तुलसीदास* यांनी रामचरित मानस मध्ये म्हटले आहे की, *'ढोल गवाँर शुद्र पशु नारी, सब ताडन के अधिकारी।’*

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२)* नुसार स्त्रीला मारहान करणे व स्त्रीची हत्या करणे फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. याशिवाय स्त्रीला त्रास होवू नये म्हणून *इंडियन माईन्स अॅक्ट १९४६* ची निर्मिती करुन *स्त्री कामगारांना खाणीत, जमिनीच्या आत काम करण्यास व रात्रपाळीस बंदी घातली.* तसेच *माईन्स मॅटर्निटी बेनेफिट अॅक्ट* तयार करुन *स्त्रियांना बाळंतपणाची रजा देण्याची शिफारस* केली. *पुढे घटनेने हा कायदा देशातील सर्व स्त्रियांसाठी लागू केला.* त्याच प्रमाणे घटनेच्या *कलम ४२* नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी सोयी व सुरक्षित व्यवस्था देण्यात यावी असे बंधन मालकावर टाकण्यात आले.

💥८.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ५-१४७ नुसार कुटुंबातील कोणत्याही स्त्रीला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाकारला.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम १४* नुसार  स्त्री किंवा पुरुषाला समान अधिकार असल्यामुळे *स्त्रीला व्यवहाराबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार* दिला आहे. एवढेच नव्हे तर घटनेच्या *कलम ३९ (क)* नुसार *उपजिविकेचे पर्याप्त साधन मिळविण्याचा अधिकार* दिला. तसेच घटनेच्या *कलम ३२५* नुसार बाबासाहेबांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यासाठी *मतदानाचा अधिकार* दिला. या महत्वपुर्ण अधिकारांमुळे लोकशाहीतील सर्वश्रेष्ट असं शस्त्र स्त्रियांच्या हातात देवून व त्यांना *सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग सुकर* करुन बाबासाहेबांनी स्त्रियांवर अनंत उपकार केले आहे.

💥९.मनुस्मृतील श्लोक क्रमांक ९.१६ नुसार स्त्रीच्या बाबतीत असे म्हटले की परमेश्वराने जन्मताच तिच्यात अत्यंत विघातक दुर्गुण घातले आहेत. श्रीकृष्णाने भगवतगिता श्लोक क्रमांक ९.३२ नुसार स्त्रियांना पापयोनी म्हटले आहे.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *अनुसुची ७ क्रमांक ३ (१)(२)* नुसार स्त्रियांची मानहानी करणे व *कलम १४* नुसार लिंगभेद करण्यास मनाई केली आहे. तसेच घटनेच्या *कलम ३९ (क)* नुसार कायद्याने न्याय देतांना स्त्री पुरुष असा लिंगभेद करता येत नाही.

💥१०.विधवा स्त्रीचे केशवपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी करणे, स्ञीला सती जाण्यास प्रवृत्व करणे, होळीच्या दिवशी नग्न नाचविणे ( मध्यप्रदेशात होळीच्या दिवशी शुद्र स्त्रीला नग्न नाचविण्याची प्रथा आहे.) इत्यादी स्त्रियांना हिनत्व आणणाऱ्या कुप्रथा स्त्रियांवर हिंदू धर्माने लादल्या.

👉बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या *कलम ५१ (ड)* नुसार  *स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचविणाऱ्या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली.*

👉 *हिंदु धर्मातील ब्राम्हणी व्यवस्थेतील मनुच्या कायद्याने व इतर धर्मग्रंथाने स्त्रियांना व बहुजन समाजाला गुलाम केले.* म्हणूनच महात्मा फुल्यांनी, *‘मनुस्मृती जाळली पाहिजे’* असे जळजळीत उद्गार काढले होते. बाबासाहेबांनी आपल्या गुरुची आज्ञा समजून प्रत्यक्षात *दिनांक २५ डिसेंबर १९२७ रोजी हा काळा कायदा जाळला.*  ते मनुस्मृती जाळून थांबले नाहीत तर त्या ठिकाणी *समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायावर आधारित भारतीय घटना २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राष्ट्राला अर्पण करुन  तिची अंमलबजावणी दिनांक २६ जानेवारी १९५० पासून सुरु झाली.*
👉आज फुले-आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वामुळेच भारतीय स्त्री देशाच्या प्रधानमंञी, राष्ट्रपती सारख्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहेत. तेव्हा *भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे द्वार उघडून देणाऱ्या या महामानवांसमोर समस्त स्त्रियांनी कृतज्ञतेने नतमस्तक व्हायलाच पाहिजे.*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

काळ्या केसांसाठी

आरोग्य जीवन:
अकाली केस पांढरे होणे :

वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ.कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात.

शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. अकस्मात दुर्घटना किंवा शोक संदेश मिळाल्यासही लोकांचे केस पांढरे झाल्याचे आढळले आहेत.

एकाच वेळी सगळे केस पांढरे होणे असे प्रकार विचित्र या सदरातच मोडतात. सर थॉमस मूर तसेच मेरी ऍन्टोनेट अशा प्रसिद्ध व्यक्तींचे सर्व केस काही क्षणातच पांढरे झाले होते. असेही काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांना अद्यापही या गोष्टीचे खरे कारण समजू शकलेले नाही.

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, केसांची उचित सफाई, संतुलित आहार, व्यायाम उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाटःई शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅलशीअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्स मध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.

शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळवीत या करिता आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश असावा.

अकाली केस पांढरे होण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :

एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता.थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात.केस धुण्यासाठी साबण व शाम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खुप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नक.केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वालविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी वापर करावा.

मेंदी :

पांढऱ्या केसांसाठी वनौषधी संच -

(मेंदी, आवळा, मंडूर, जास्वंद, माका, मुलतानी माती, मोतिया, रोशा तेल)

मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे,तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणाऱ्या मेंदीची टनावारी वाढतच आहे.

केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.

मेंदी फक्त पांढऱ्या केसांनाच रंगवते (काळे केस तसेच राहतात.) बऱ्याचजणांना नुसत्या मेंदीने केसांना येणारा रंग आवडत नाही. म्हणून या संचात मंडूर (लोह) व आवळा यांचे मिश्रण सोबत वापरले जाते. मंडूर व आवळ्याच्या रासायनिक संयोगाने काळा रंग तयार होतो. माका व जास्वंद या दोन्ही वनौषधी केशरंजक मान्यता पावल्या आहेत.अ मुलतानी मातीने मिश्रणाला चिवटपणा येऊन केसांवर पसरता येते. हा अनुभव अल्हाददायी व्हावा. म्हणून केशवर्धक मोतियारोशा तेलही संचातच दिले जाते.

आजकाल तरुण मुलां-मुलीतच पांढरे केस दिसू लागले आहेत. आहारातल्या चुका, मानसिक ताण व रासायनिक प्रसाधनांचा जबरदस्त प्रचार याला बळी पडलेल्या आमच्या नव्या पिढीला या वनौषधी हे एक वरदान आहे.

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

श्रद्धा असू द्यात

*हे कायमचे लक्षात ठेऊया:*

*1) 🤑🌶🍒 लिंबू-मिरची खायची असतात - बांधण्यासाठी नसतात..*

*2) 😱🐈 मांजर पाळायची असते - मांजर आडवी गेली कि काही वाईट होत नाही.उलट उंदरांपासून नुकसान होण्याचे टळते.*

*3) 🗣💭💃 शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार आहे - शिंकल्याने काही अघटीत होत नाही किंवा काही अडचणीही येत नाहीत..*

*4) 💀🌳 भूत झाडावर राहत नाही - झाडावर पक्षी राहतात..*

*5) 🔬🔭 चमत्कार असे काही नसते - प्रत्तेक गोष्टी मागे विज्ञान आहे प्रत्येकाला कारण आहे..*

*6) ⛄☃ बुवा, बाबा लोक खोटे आहेत - ज्या लोकांना अंग मेहनत करायची नसते तेच हे लोक..!!*

*7) ⛈🌪👺🔥 करणी,         जादू टोणा काही नसते - हे भ्याड लोकांच्या मनाचे खेळ आहेत..*
*जादू-टोणा करून ग्रहाची दिशा बदलणारे हे ढोंगी बाबा: वारा, ढगांची दिशा बदलून पाऊस का पाडत नाहीत...?*⛈☁🌒💫

*8)🌏🐠वास्तुशास्त्र भ्रामक आहे. केवळ दिशांची भिती दाखवून लूट आहे.*
*खरे तर पृथ्वी ही स्वत: क्षणा* *क्षणाला दिशा बदलत असते.*
*खरेच कुबेर उत्तर दिशेला* *असता तर जगातील इतर ठिकाणी कसा आला नाही.*

*9) 👼🐓🐐🍇🍎नवसाने,  व्रताने, पुजेने, नैवैद्याने, बळीने, देणगीने, प्रसन्न होऊन फळ देतो देव, म्हणजे तो काय लाचखाऊ आहे का ?!!*

*10) हे जे वाचलात ते स्वता अनुकरण करा आणि आपल्या मित्रांना देखिल send करा ।*

*हा मैसेच बाकी ग्रुपवर send केल्यामुळे काही चांगली बातमी येणार नाही पण पुढची पीढ़ी नक्की  सुधरे

☀  मुहूर्ताचे वेड ☀
ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहर्थ पहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस,, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आपल्यासाठी  सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे..!!

☀ कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढले जातात तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात...? 
पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का  होतात, तर काही अकाली मृत्यू होतात असे का..?
95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरावा...?
  
☀ मुहूर्त पाहून निवडणुकीसाठी उभे राहणा-या सर्व उमेद्वारांपैकी एकच निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते.....? एकालाच मुहूर्त शुभ होता काय ?

मंत्रीपद मिळाल्यानंतर  मंत्रालयाची  जबाबदारी स्वीकारण्यासाठी  व खुर्चीवर बसण्यासाठी  शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात...????  मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते !

☀ शुभ मुहूर्तावर  मूल जन्माला घातल्यास  वैज्ञानिक,  राष्ट्रपती,  पंतप्रधान  होईल काय..?
☀ अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेली  व्यक्ती ....ती पण ..अंबानीसारखी  झाली का...?

☀ उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर  , उद्योजक, आपल्या कार्यालयाचे  बांधकाम करतांना,  व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.....तरी सुद्धा  कित्येकांना अपयश येते असे का...?

         :  कारण :
☀   शुभमुहूर्त  हे थोतांड आहे सत्य नव्हे... ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो ,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.
☀मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली ...आणि कधीही मुहूर्त न पाहणारी .....ब्रिटिशशाही अख्खा  भारत देश गिळून बसली.
☀स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले कर्म हेच देव-ईश्वर माना.

☀ जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर..... स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा.  यश न आल्यास नुकसानभरपाईचा दावा ठोकेल  असे सांगा . ते तुमच्या जवळही फिरकणार नाहित.
कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.

☀ जर तुमचं  मन साफ असेल व  तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल....तर तुमच्यासाठी कोणतीही  वेळ  ही  ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.

🙏🏻चला..जगण्याची दिशा बदलूया..!!
सुरुवात स्वतःपासून..!!🙏🏻

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

प्रयत्नांती यशप्राप्ती

सौ प्रांजली पाटील. देशातील "पहिली "दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी

अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला

आज एका "असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय असे उधाहरण आहे जे आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करून जिद्द निर्माण करणारे आहे .तसे पाहिले तर आज आपल्या देशाच्या ईतिहासत एक गौरवदिन आहे कारण आज गेल्या ..वर्षी यूपीएससीतच्या परीक्षात पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी सौ प्रांजली पाटील.ह्या उत्तीर्ण झाल्या आहेत .दृष्टिहीन असलेली प्रांजली लहेनसिंग पाटील (वय 28) ही परीक्षेत 773 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाली आहे. अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणारी ती पहिली महिला ठरली आहे.

समाजात अनेक ठिकाणी फिरताना असे चित्र दिसते की आज कुठे तरी या अंध
आणि अपंग असे प्रतीभावत जे विद्यार्थी आहेत ते मागे राहतात ना रोजगार
ना कायम स्वरूपी निवास पण आता काळ बदलत आहे . याचा सर्व पदवीधर
विद्यार्थीनी आपल्या योग्य वयात उपयोग करून घ्यावा .जरूर मार्गदर्शन मिळेल .

मलकापूर तालुक्‍यातील वडजी हे प्रांजलीचे मूळ गाव. लहानपणापासून नजर कमकुवत असल्याने, शालेय जीवनातच प्रांजलीला अंधत्व आले. मात्र आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने प्रांजलीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बी. ए. मध्ये विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान तिने मिळविला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रांजलीने प्रयत्न सुरू केले.

आज तिच्या मेहनतीला यश आले आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) निवड चाचणीत हजारो मुलांच्या निवडीतून प्रांजलीची निवड झाली. "जेएनयू‘तून तिने एमए. एम. फिल केले. याच विद्यापीठात सध्या "आंतरराष्ट्रीय संबंध‘ या विषयात ती पीएच.डी. करीत आहे. प्रांजलीने कोणताही खासगी क्‍लास न लावता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. भुसावळ तालुक्‍यातील ओझरखेडा हे तिचे सासर, सध्या ती पतीसमवेत उल्हासनगर येथे स्थायिक आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राहूनच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अभ्यासाशी नेहमी मैत्री केल्याने आजवरचा प्रवास आनंददायी ठरला आहे. दोन्ही डोळ्यांना अंधत्व असल्याने, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, आई-वडील आणि पतीच्या साथीने यश मिळाले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठलेही दडपण न घेता पुस्तकांशी मैत्री करावी.

रविवार, ११ डिसेंबर, २०१६

निसर्ग

🍀🌴🌻🍁🍃💐🌷🍂🌿🌾🌸

"निसर्ग तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग
करतो ना ...
ढग तूटतात आणि पाऊस पडतो,
जमीनीला भेगा आल्या कि शेत बनते,
वृक्ष तुटतो तेव्हा बीज उमलतं आणि
बीज अंकुरलं की झाड होतं.
म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो तेव्हा समजून घ्यायचं  की निसर्ग
आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी
करत आहे

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

सबका मंगल हो

*तथागत बुद्धांची शिकवण*

१) मूर्खांची संगती करु नका.
२) विद्वानांची संगती करा.
३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
४) अनुकूल देशात निवास करा.
५) चांगली कामे करा.
६) चित्तास स्थिर ठेवा.
७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
८) विद्वान व्हा.
९) संयमी राहा.
१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
११) मातापित्याची सेवा करा.
१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
१४) दानधर्म करा.
१५) धम्माचरण करा.
१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
१७) निर्दोष कर्मे करा.
१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
२१) गौरवाची भावना जोपासा.
२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
२३) क्षमाशील असा.
२४) संतुष्ट असा.
२५) कृतज्ञ असा. लीन असा.
२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
२९) ब्रम्हचारी राहा.
३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.
-नमो बुद्धाय


  *।।पंचशील।।*
      
 1⃣मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
2⃣मी चोरी करण्यातासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
3⃣मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
4⃣मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
5⃣मी मद्य,मादक तसेच इतर सर्वमोहांत पाडणार्या मादक वस्तुंच्या सेवनातासुन अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
------------------------


  *चार आर्य सत्य*
1⃣दुःख  :
:- मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.
2⃣दुःख समुदाय  :
:- दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.
3⃣दुःख निरोध  :
:- तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.
4⃣दुःख निरोगामिनी प्रतिपदा  :
:- दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.
↔↔↔↔↔↔↔↔     *आर्य अष्टांगिक मार्ग*
       *(सदाचाराचा मार्ग)*
1⃣सम्यक दृष्टि  :- निसर्ग नियमा विरुद्ध कोनतीही गोष्ट होऊ  शकते ही गोष्ट न मानणे.
2⃣सम्यक संकल्प  :-  म्हणजे योग्य निर्धार, विचार.
3⃣सम्यक वाचा  :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.
4⃣सम्यक कर्मांत  :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
5⃣सम्यक आजिविका  :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
▶सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.
7⃣सम्यक स्मृती  :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.
8⃣सम्यक समाधी  :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन् अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे।
▶▶▶▶▶▶▶▶
   *दहा पारमिता*
          *(शिल मार्ग)*
1) शिल  :- शील म्हणजे नितिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे  असलेला मनाचा कल.
2) दान  :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त,देह अर्पण करणे.
3)उपेक्षा  :-  निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत रहाणे.
4) नैष्क्रिम्य  :-  ऐहिक सुखाचा त्याग करणे.
5)वीर्य  :-  हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.
6)शांती:- शांति म्हणजे क्षमाशीलता,द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
7) सत्य  :- सत्य म्हणजे खरे,मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
8) अधिष्ठान  :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
9) करुणा  :- सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
10) मैञी  :- मैञी म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शञूविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमाञाविषयी बंधुभाव बाळगणे.


जर आपण या बौद्ध् तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो.
* सबका मंगल हो .....