एकूण पृष्ठदृश्ये

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

सकारात्मक विचार

*सकारात्मक विचारांचे सामर्थ्य*
मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्‍या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.
‘‘चाँद मिलता नही - सबाके संसार मे ।
है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70%  विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन  नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. - थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला - 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
नेपोलियन समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली.  तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला,  ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली.  हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’  भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

पायवाट

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई I
दुःख उजळायला आसवांना वेळ नाही ॥
पांगळ्याच्या सोबतीला येऊ दया ,बलदंड बाहू I
निर्मितीची मुक्तगंगा या इथे मातीतच वाहू ॥
नांगरू स्वप्न उदयाची, इथे फुलतील शेते I
घाम गाळील ज्ञान येथे, येथून उठतील नेते॥
आता येथे ज्ञानाचीही उजाडे पहाट I
नव्या आसवांची इथून निघे पायवाट....
🌹 बाबा आमटे🌹

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

प्रेरणा दिन

🐾☘🐾☘🐾☘🐾☘🐾

          🙏7 नोव्हेबर 1900🙏

             शाळा प्रवेश दिन
                       🌹
             अर्थात प्रेरणा दिन

भारतीय सविधान निर्माता,
भारताचे देशाचे,उध्दारक,
विश्वरत्न, बोधीसत्व,
प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर
    याचा शाळा प्रवेश दिनाच्या सर्व भारतीयाना हार्दीक शुभेच्छा💐💐

07 नोव्हेबर 1900 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा सातारा येथील प्रतापसिग हायस्कुल राजवाडा शाळेत प्रवेश झाला याला ११६ वर्ष पुर्ण झाली

प्रत्येक भारतीय नागरीकानी हा दिवस जवळच्या शाळेत साजरा करा विदयार्थायाना प्रेरणा दयावी


🙏जय भिम👏👏👏
🙏जय भारत👏👏👏

शाळा प्रवेश बाबांचा

🐾☘🐾☘🐾☘🐾☘🐾

          🙏7 नोव्हेबर 1900🙏

             शाळा प्रवेश दिन
                       🌹
             अर्थात प्रेरणा दिन

भारतीय सविधान निर्माता,
भारताचे देशाचे,उध्दारक,
विश्वरत्न, बोधीसत्व,
प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर
    याचा शाळा प्रवेश दिनाच्या सर्व भारतीयाना हार्दीक शुभेच्छा💐💐

07 नोव्हेबर 1900 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा सातारा येथील प्रतापसिग हायस्कुल राजवाडा शाळेत प्रवेश झाला याला ११६ वर्ष पुर्ण झाली

प्रत्येक भारतीय नागरीकानी हा दिवस जवळच्या शाळेत साजरा करा विदयार्थायाना प्रेरणा दयावी


🙏जय भिम👏👏👏
🙏जय भारत👏👏👏

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

जिल्हा परिषद अध्यक्ष

✅जिल्हा परिषद✅
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
रचना :-
प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
सभासद संख्या -
प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
सभासदांची निवडणूक -
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
पात्रता (सभासदांची) -
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण :
1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
कार्यकाल :
5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :
जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
कार्यकाल :
अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
राजीनामा :
1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष - 20,000/-
अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
बैठक :
जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.