एकूण पृष्ठदृश्ये

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

*शीलवान छत्रपती*

शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण...!
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान ...!!

काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन,
अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून...!
त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!

बांधीत होता मस्जिद ईथे अन् तेथे मंदिर,
त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर...!
अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!

वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन,
मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन...!
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण,
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान...!!

*@महाकवी वामनदादा कर्डक*

सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

७/१२ Online

https://d6aeu.app.goo.gl/0xZE
आता तुमचा सातबाराचा (७/१२) उतारा मिळवा Android App द्वारे फक्त ६ स्टेप्स मध्ये.
एवढेच नाहीतर,या APP द्वारे तुम्ही तुमचा ७/१२ चा उतारा PDF स्वरुपात किंवा direct App मध्ये सुद्धा save करू शकता (Secured Save Mode).

App ची वैशिष्ट्ये :-
१) ७/१२ उतारा व ८अ शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव द्वारे Search करून
२) तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा App मधून direct Share करा
३) ६ सोप्या स्टेप्स.
४) कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण्याची सोय.
५) २ modes : advanced mode (प्रगत मोड) आणि normal mode (सामान्य मोड).
५) ७/१२ चा उतारा PDF स्वरुपात save करण्याची सोय.

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

मानवता धर्म

.            🙏🏼 *मंगलमय बुद्धविचार* 🙏🏼

             गौतम बुद्धांना लहानपणी सिद्धार्थ म्हणत. हा सिद्धार्थ लहानपणापासून विचारी आणि चिकित्सक होता. जेव्हा इतर मित्र खेळण्यात दंग असायचे, तेव्हा हा सिद्धार्थ ध्यानस्थ बसलेला असायचा. तो बारा वर्षांचा होता, तेव्हाची गोष्ट. त्याचे सर्व मित्र, चुलतभाऊ शिकारीला निघाले. पण सिद्धार्थ मात्र बसून होता.
     आईने विचारले, " सिद्धार्थ, शिकारीला जाणार नाहीस का ?" सिद्धार्थाने मानेनेच नाही म्हणून सांगितले.
               " अरे तू शिकारीला गेलं पाहिजेस, तुला शिकार करता आली पाहिजे."
            सिद्धार्थ म्हणाला, " आई, मला माहीत आहे, हे लोक वाघाची शिकार करणार नाहीत. शिकार केली तर ससा किंवा हरिण अशा निरुपद्रवी प्राण्यांची ते शिकार करतील."
            " अरे, कसंही असलं तरी तू शिकारीचा सराव करायला हवास, त्याशिवाय तुला शस्त्र कशी चालविता येतील ?" आई म्हणाली.
         " पण मला शस्त्रे चालविण्याची गरज काय ?"
         *" सिद्धार्थ, तू राजपुत्र आहेस. पुढे जाऊन तू या राज्याचा राजा होणार आहेस. लढाई करणे हा तुझा धर्म आहे. म्हणून तू शस्त्रे चालविण्यात पारंगत व्हायला हवेस."*
              त्यावर सिद्धार्थाने दिलेले उत्तर आजच्या कट्टर धर्मप्रेमींनीही विचार करावा असे आहे.
           सिद्धार्थ म्हणाला, *" आई, जो धर्म लढाई करायला सांगतो, तो कसला धर्म ? माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे. प्रेमाने आपुलकीने रहावे. लढाई, भांडण करू नये. सर्वांशी न्यायाने वागावे. असे सांगणारा, प्रेम, दया, शांतीचा मार्ग दाखविणारा धर्म हवा. मलाच नाही, तर जगातील प्रत्येक माणसाला अशाच धर्माची गरज आहे."*

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

विचार- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर*

"अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा".

*विचार- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर*