एकूण पृष्ठदृश्ये

रविवार, ३० एप्रिल, २०१७

गावगाडा

*व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;*    

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!

नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!

जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्व
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते .

मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन व उत्पादकता वाढविणे

ब-याचशा फळबागा या नांग्या न भरणे खते व औषधे यांचा अयोग्य वापर व अय़ोग्य मशागतीय पध्दतीचा अवलंब केल्याने जुन्या बागांची उत्पादकता कमी झालेली असून या घटकांपर्यत या बागेचे पुनरुज्जीवन करून उत्पादकता वाढविणे हा उद्देश आहे.

लाभार्थी –

१. वैयक्तिक शेतकरी, २. संस्था, स्वयंसेवी गट, ३. अशासकीय गट.

अनुदान –
खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये १५०००/ प्रती हेक्टर याप्रमाणे राहील. कमाल २.०० हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेता येईल.

पुनरुज्जीवन करावयाच्या फळझाडांचे वय खालील प्रमाणे

अ.क्र फळपिकांचे नाव फळपिकांचे वय (वर्ष)
कमीत कमी वय / जास्तीत जास्त वय
१ आंबा २० ५०
२ चिक्कू २५ ५०
३ डाळींब ८ २०
४ संत्रा १० २५
५ मोसंबी १० २५
६ लिंबू ८ २०

सोमवार, २४ एप्रिल, २०१७

गावची यात्रा 2017

रोजगार हमी योजना


राज्यात कृषि हवामानातील विविधतेमुळे अनेक प्रकारची फळपिके घेणे शक्य आहे. तसेच क्षेत्र विस्तारासाठी वाव असल्या कारणास्तव या योजनेचा समावेश केला गेला आहे.

उद्देश –

१) प्रत्येक विभागातील हवामानानुसार चांगल्या प्रकारे येणा-या फळपिकाखालील क्षेत्र विस्तार करणे.

२) फळपिकांचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देणे.

३) जुन्या दुर्लक्षीत फळबागांचे उत्पादन वाढीसाठी अत्यावश्यक निविष्ठांच्या पुरवठा करणे.

४) फळांचे उत्पादन वाढीसाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे.

५) वनस्पती आरोग्य चिकित्सालय, मुलद्रव्ये तपासणी प्रयोगशाळा व रोगाचे पुर्वानुमान केंद्रस्थापनेसाठी अर्थसहाय्य देणे.

६) अभियानातील लागवडी समुह पध्दतीने करतांना परीसर ही संकल्पना लक्षात घ्यावी.

या योजना चिकू, डाळींब, कागदी लिंबू या फळपिकांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच या योजनेमध्ये बहुवर्षीय द्राक्ष पिक व वार्षिक द्विवार्षिक केळी पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

अनुदान –

अ) बहुवार्षीक – द्राक्ष क्षेत्र विस्तार याकरीता खर्चाच्या ७५ टक्के किंवा कमाल रुपये २२५०० प्रती हेक्टर अर्थसहाय्य राहील.

ब) वार्षिक / द्विवार्षिक – केळी क्षेत्रविस्तार याकरीता खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल रुपये १५०००/ अर्थसहाय्य देय राहील.

क) अर्थसहाय्य तिन वर्षामध्ये ५०.३०.२० याप्रमाणे विभागून देण्यात येईल.

ड) तसे द्राक्ष व केळी या दोनही पिकांकरीता क्षेत्रमर्यादा ४.०० हेक्टरपर्यत राहील.

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

याला म्हणतात निष्ठा

शिवाजी महाराज गोवळकोंड्याला निघाले.
पालखीत बसले.
मागं-पुढं सैन्यं आहे.

अचानक...

महाराजांची पालखी थांबली.
महाराजांना काही कळेना,
पालखीचा पडदा सरकला.
बाहेरं बघितलं.
रखरखतं, रणरणतं वाळवंट.
म्हणजे,
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग पालखी का थांबावी?

महाराजांनी शिलेदाराला विचारलं,
'पालखी थांबवायचं प्रयोजन'.

तसा शिलेदार धावत आला.
'महाराज, गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा स्वतः जातीनं आलेत.'

महाराजांना आश्चर्य वाटलं.
गोवळकोंडा तर अजून कोसो दूर.

मग, बादशहा इथं !

महाराज पालखीतनं खाली उतरले.
समोर पाहिलं.

गोवळकोंड्याचे बादशहा-कुतुबशहा.
महाराज नजदीक गेले.
गळाभेट घेतली.

महाराजांनी विचारलं, 'बादशहाजी, आपणं इथं?'

तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, महाराष्ट्राचा 'जाणता राजा' आमच्या मातीत येतोय.
त्याची पाऊलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याच्या पाऊलांची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपावेतो आलो महाराज.'

अरे, कोण गौरव माझ्या राजाचा.
एवढचं नाही या गोवळकोंड्याच्या बादशहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजतगाजत त्यांना स्वतःच्या राजधानीत घेऊन आला.

आगत-स्वागत, सत्कार-सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशहा महाराजांना आपलं ऐश्वर्य, सामर्थ्य, संपत्ती दाखवत निघाला.

'महाराज, हा आमचा खजाना.
हिरे, मोती, माणकं, सोनं, नाणं.
राशी राशी नुसत्या'.

बघत राहिले महाराज.

अरे, कोण ऐश्वर्य!!! कोण संपत्ती!!!

'महाराज, हि आमची अस्त्रंशाळा.
इथं नानाविध अस्त्रं तयार केली जातात.'
महाराज चकित झाले.

'महाराज, हि आमची शस्त्रंशाळा.
इथं वेगवेगळी शस्त्रं बनवली जातात.'

महाराज बघत राहिले.

'महाराज, हि आमची अश्वंशाळा.
इथं जातीवंत घोड्यांची पैदास केली जाते.'
महाराज पहातच राहिले.

आणि

'महाराज, हि आमची हत्तीशाळा.'
हजारोंच्या रांगेनं उभे असलेले कर्नाटकी बुलंद आणि बलाढ्य हत्ती नजरेत ठरतं नव्हते.

अरे, कोण सामर्थ्य!!!
कोण सामर्थ्य!!!

महाराज भारावले.
पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावलेली नजर बघून
गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला,

'महाराज, आपल्याकडं सुद्धा आमच्यासारखे असे
हत्ती असतीलंच कि?'

महाराजांना काय सांगावं काही कळेना.

आमच्या सह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही.
सबब आमच्याकडं हत्ती नाहीयेत.

पण सांगावं कसं ?

तसे महाराज म्हणाले, 'बादशाहजी, आमच्याकडं तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्रं हत्तीसारखी  'माणसं' जरूर आहेत.

मात्र गोवळकोंड्याचा बादशहा त्याच्याही पुढचा.
तो म्हणाला, 'महाराज, आपल्याकडं आमच्यासारखे हत्ती नाहीत,
मात्रं हत्तीसारखी माणसं आहेत.
मग !

'महाराज, त्या हत्तीसारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलायं का?'
महाराजांच्या शेजारी
'येसाजी कंक
उभा होता.

महाराजांनी येसाजीच्या पाठिवर थाप
टाकली आणि महाराज म्हटले, 'हा त्यातलाच आहे.'
तसा गोवळकोंड्याचा बादशहा म्हणाला, 'महाराज, हा येसाजी हत्तीसारखा-हत्तीच्या ताकदीचा.'

मग!

'महाराज, तुमचा येसाजी माझ्या एखाद्या हत्तीशी झुंज खेळेल का?
तसा येसाजी सर्रदिशी पुढं झाला.
'आज्ञा द्यावी महाराज.'
महाराजांची इशारत झाली.

येसाजी रणं मैदानात उतरला.

एक मात्र अत्याधुंद, बलाढ्य आणि बुलंद हत्ती सामन्याला.
नजरं विकरं नेत्रं झाली
त्याचा कर्णकर्कश्य चित्कार घुमला आणि माणसांच्या कानठळ्या बसल्या.
"अरे, एsss...एsss...ए..ए वेड्या,
येसाजी, नको करू
धाडस.
येsss येsss ये फिर माघारी. मरशील फुका.'

पण येसाजी पुढं झाला होता.
हत्तीच्या सामने खडा ठाकला होता.
हत्तीच्या शिखरापुढे तो घुमला.
सोंड फिरली. सोंडेत येसाजी अडकला.
गर्र..sss...गर्र...sss...
गर्र...sss...गर्र...sss...गर्र.
माणसांनी मिटले डोळे.
'संपला येसाजी.'

पण,
त्याचवेळी विद्युलता चमकावी तसा येसाजी फिरला होता.
आकाशातून उडाला होता.
समशेर तळपली होती.
चालली होती सप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.
एक भयानक चित्कार घुमला होता आणि सोंड छाटला हत्ती ढासळला होता.
येसाजीच्या समशेरीतून रक्तं नितळत होतं.
महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता.
येसाजी जिंकला होता.
त्याचं ते आस्मानी शौर्य बघितलं आणि गोवळकोंड्याचा बादशहा भारावला.

अरे, कोण शौर्य! कोण बहादुरी!

त्यानं स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला.
येसाजीच्या समोर धरला.
'हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस.'
तसा येसाजी सर्रदिशी मागं सरला आणि बादशहाला म्हणाला,

'आमचं कौतुक करायला आमचे 'महाराज'
समर्थ आहेत.'
दुसऱ्याच्या कौतुकाची थापसुद्धा मावळ्यांनी कधी आपल्या पाठीवर पडू नाही दिली.

'निष्ठा' नाव याचं.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'अस्मिता' जिवंत असते.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'स्वाभिमान' जिवंत असतो.
हि 'निष्ठा' जिथं जिवंत असते,
तिथं 'राष्ट्रं' जिवंत असतं.

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

इनाम जमिनीचा कायदा


सन १८६० ते १८६२ या कालखंडाच्या दरम्यान इनाम कमिशन ने स्वतंत्र चौकशी करून इनामाची सनद

१. पाटील
२. कुलकर्णी / गावाचा रोखपाल
३. सुतार
४. लोहार
५. चांभार
६. कुंभार
७. न्हावी
८. परिट
९. जोशी/ब्राम्हण
१०. गुरव/ धर्मगुरू
११. सोनार
१२. महार

अशा बारा बलुतेदारांना प्रदान केल्या गेल्या इंग्रज सरकारने प्रशासन व समजण्याच्या दृष्टीने इनाम व वतन जमीनीचे तीन वर्गात विभाजन केले ते खालील प्रमाणे :

१. सरकार उपयोगी वतन :

या वतनामध्ये प्रामुख्याने पाटील,राव, खोत, गावडा, गावकर, नाईक, कुलकर्णी, पांड्या, कर्णिक, चौगुला, इत्यादी वतनांचा समावेश होतो.

२. रयत उपयोगी वतन :-

या वतनामध्ये जोशी, गुरव, जंगम, काझी, सुतार, लोहार, चांभार, यांचा समावेश होतो.

३. सरकार व रयत उपयोगी वतन :

या वतनांमध्ये सोनार, शिंपी,तेली, माळी, तांबोळी, गवंडी, कासार, इ. समावेश होतो.

इनाम जमिनीची नोंद जिल्हा व तालुकास्तरावर लॅड अलीनेशन रजिस्टरला केलेली असते. इनाम जमीन बाबत सरंजाम व इनाम कायद्यातील तरतुदी व सनदेत अटींना अधीन राहून उपभोगण्याचा हक्क होता तर

१. दि. ३०/०४/१९५६ रोजी मुंबई परगणा व कुलकर्णी वतन निरास कायदा १९५०.

२. दि. ३०/०४/१९५६ रोजी मुंबई नोकर इनामे लोकोपयोगी नष्ट कायदा १९५३.

३. दि. ३०/०४/१९५६ रोजी मुंबई विलीन मुलखातील किरकोळ इनामे नष्ट कायदा १९५५.

४. दि. ३०/०४/१९५६ रोजी मुंबई कनिष्ठ गाव नोकर वतने निर्मूलन कायदा १९५८.

५. दि. ३०/०४/१९५६ रोजी मुंबई महाराष्ट्र मुलकी पाटील पदनिरास कायदा १९६२ अन्व्ये वतने खालसा करण्यात आली.

देवस्थान इनाम अथवा अनुदान आणि धर्मादाय इनाम ही इनामवर्ग ३ मध्ये समाविष्ट होतात. या शासकीय अनुदानाचा एकमेव उद्देश धार्मिक संस्थांना साहाय्य करणे, देवळे, मठ, धर्मशाळा, मशिदी, इत्यादी संस्थांना मदत करण्यासाठी प्राचीन राजे वेळोवेळी मदत करत असत. अशा देवस्थान इनामाच्या सनदा देण्यात आल्या व त्यावरील हस्तांतराला कायमस्वरूपी मनाई करण्यात आली. याशिवाय जमिनीची पेरणी/ नफा आळीपाळीने घेता येत असला तरीही जमिनीची विभागणी कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही. परंतु काही ठराविक परिस्थितीत मिळकतीचा फायदा होणार असेल किंवा कायदेशीर आवश्यकता असेल तर साधारणतः देवस्थान जमिनीचे हस्तांतरण स्वीकारले जात होते. मात्र नियम म्हणून ही इनाम वारसा हक्काने हस्तांतरित होत नाहीत किंवा विभागणीही होत नाही. मात्र या जमिनींचा भोगवटा, पीक पाहणी/ व्यवस्थापन वारसा हक्काने होऊ शकते. सदर देवस्थान इनाम जमिनी देताना सनदेत संबंधित संस्थेला जमीन मालमत्ता दिल्याचे जोपर्यंत स्पष्ट नमूद केलेले नसेल तोपर्यंत धार्मिक इनामे ही जमीन महसूल अनुदाने आहेत असेच कायदा समजतो. याचाच अर्थ देवस्थान वर्ग-३ इनामे ही हस्तांतरणीय नाहीत.

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

शेतकऱ्यांसाठी काही योजना

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तीक शेतक-यांच्या विकास संकल्पनेपेक्षा सामुदायीक शेतक-यांच्या गटाची स्थापना करून त्याच्यात विकास घडवून आणण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना या अभियानातून आपल्या शेतीच्या विकास करून आर्थिक उन्नती साधावयाची असेल तर एका विचाराचे एक समान गरजेसाठी शेतक-यांचे गट स्थापन करण्याची नितांत गरज आहे. या अभियानात जमिनीचा पोत सुधारण्यापासून बियाणे, कलमे, रोपे, खते, औषधे या प्रारंभीच्या गरजांबरोबरच काढणी, वाहतूक, साठवणूक, प्रक्रीया व विक्री व्यवस्था या सर्व समावेशक विकास कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान उद्दिष्टे –

अ) फलोत्पादन क्षेत्राचा संशोधन, तंत्रज्ञान प्रसार, काढणीत्तोर तंत्रज्ञान, प्रक्रीया, पणन सुविधा यांच्या मध्यमातून सर्वांगीण विकास.

ब) शेतक-यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, व आहार विषयक पोषणमुल्य वाढविणे.

क) अस्तित्वात असलेल्या फलोत्पादन विषयक विविध योजनांमध्ये समन्वय साधून एकरूपता विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

ड) पारंपारीक उत्पादनत पध्दतीची आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी सांगड घालून तंत्रज्ञानाच्या विकास व त्याचा प्रसार आणि प्रचार करणे.

इ) कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांकरीता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

प) सन २०११-१२ या अभियानाच्या कालावधीअखेर पर्यंत फलोत्पादन क्षेत्राचे दुप्पट करणे.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान विविध योजना –

१) आदर्श रोपवाटीका स्थापना -

फलोत्पादन निश्चीत व शाश्वत उत्पन्न देणारे क्षेत्र म्हणून ओळखले जाते राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात सन २००५-०६ मध्ये लागवडीसाठी नवीन क्षेत्र आणणे, जून्या, बागांचे पुनरूज्जीवन करणे, नवीन वाणांची लागवड करणे इ. कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात आदर्श रोपवाटीका तयार करणे प्रस्तावीत आहे.

उद्देश –

१) राज्यात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात ४ हेक्टरच्या मोठ्या व १ हे. च्या छोट्या रोपवाटीका तयार करणे.

२) राज्यातील शेतक-यांसाठी फलोत्पादन पिकांची उत्कृष्ट वाणांची दर्जेदार व रोगमुक्त कलमे किंवा रोपे शेतक-यांना उपलब्ध करून देणे.

३) नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणाच्या मातृवृक्षांची लागवड करणे.

४) नवीन निर्यातीस वाव असलेल्या फलोत्पादन पिकांच्या वाणांची माहिती शेतक-यांना देणे तसेच उच्च तंत्रज्ञानाची प्रात्यक्षीके आयोजीत करणे.

५) रोपवाटीका धारकांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करून त्यांचे तांत्रिक व व्यवसायीक क्षमतेत वाढ करणे.

आदर्श रोप वाटीका तयार करणेसाठी –

१) पॉलीहाऊस

२) शेडनेट

३) मिस्ट चेंबर

४) मातृवृक्ष लागवड (फळे किंवा फुले)

५) मातृवृक्षासाठी ठीबक किंवा तुषार सिंचन

६) पाणी साठवण सुविधा

७) माती निर्जंतुकीकरण संयंत्र या बाबींचा समावेश असेल.

अनुदान –

रोपवाटीका सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्र

१. मोठी रोपवाटीका ४ हे रू. १८.०० लाख रु. ९.०० लाख

२. लहान रोपवाटीका १ हे रु. ३.०० लाख रू. १.५० लाख

पात्र लाभार्थी –

१. वैयक्तिक लाभार्थी,

२. सहकारी कायद्याखाली नोंदविलेली संस्था,

३. कृषि विज्ञान केंद्र इ.

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

इनाम जमिनीचे वर्गीकरण व प्रकार

इनामांचे वर्गीकरण

महसूल कायदा सांगतो, की सर्व जमीन ही सरकारची असते आणि त्यावर कर आकारणी करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो. मात्र जेव्हा अशी आकारणी करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला देण्यात येतो तेव्हा त्यालाच इनाम किंवा वतन म्हटले जाते.

इनामांचे वर्गीकरण :-

इनाम वर्ग - १ - सरंजामी वतने व इतर

इनाम वर्ग - २ - व्यक्तिगत इनामे

इनाम वर्ग - ३ - देवस्थान

इनाम वर्ग - ४ - बिगर सेवा जिल्हा वतने, (गुजरातमधील काही भागासाठी)

इनाम वर्ग - ५ - इतर जिल्ह्यांतील बिगर सेवा वतने

इनाम वर्ग - ६ - गाव कामगार आणि कनिष्ठ सेवक यात सरकार उपयोगी व समाज उपयोगी असे दोन प्रकार होते.

इनाम वर्ग - ७ - स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका आदींच्या स्थानिक फंडामधून किंवा सरकारी मदतीतून दिलेल्या महसूल माफ जमिनी.
उदा. १) शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था. २) दवाखाने, हॉस्पिटल. ३) बिगर फायदा सार्वजनिक कामे करणाऱ्या बिगर सरकारी संस्था ज्यात धार्मिक धर्मादाय संस्थांचा समावेश होतो.

रविवार, १६ एप्रिल, २०१७

इनाम जमिनी व देवस्थान जमिनीबद्दल कायदे

इनाम जमिनी

इनाम :-
इनाम हा शब्द अरेबिक भाषेतून घेतला आहे याचा अर्थ बक्षीस किंवा आपल्या ऐवजी कमी दर्जाच्या व्यक्तीला काही फायदा मिळावा म्हणून दिलेली एखादी वस्तू.

जमिनीच्या बाबत महाराष्ट्रात जमिनीचे महसुलाच्या दृष्टीने दोन भाग पडतात :-

१. खालसा जमीन
२. दुमाला जमीन

१. दुमाला जमीन :-

महसूल कायदा सांगतो, की सर्व जमीन ही सरकारची असते आणि त्यावर कर आकारणी करण्याचा अधिकार हा सरकारचा असतो. मात्र जेव्हा अशी आकारणी करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला देण्यात येतो तेव्हा त्यालाच इनाम किंवा वतन म्हटले जाते. म्हणजेच जमीन महसूल पूर्णतः किंवा भागशः वसूल करण्याचा शासनाचा अधिकार दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मालकीहक्काने हस्तांतरित होतो, त्यास दुमाला अर्थात इनाम जमिनी म्हणतात व इतर बिनदुमाला जमिनी म्हणजे खालसा.

दुमाला :-

वरिष्ठधारक आपले कनिष्ठधारकाकडून म्हणजेच जे प्रत्यक्षात जमिनी कसतात किंवा ज्यांचे ताब्यात जमिनी आहेत, असा दुमाला जमिनीच्या संदर्भातील जमीन महसूल गोळा करतो. अशा वेळी योजनेनुसार वरिष्ठधारकांना जमीन महसूल माफ करण्यात येतो किंवा त्याने वसूल केलेल्या महसुलातून काही भाग सरकारला भरावा लागतो.